Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना दारूची विक्री करणाऱ्यास अटक

Daru parwanan news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल ओंकार जवळ अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या एका शनीपेठ पोलीसांनी अटक केली असून साडेचार हजार रूपयाची दारू हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, गणेश प्रकाश चौधरी रा. कालंकामाता नगर, हॉटेल ओंकार हा घराजवळी हॉटेल ओंकार जवळ अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करत असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोनि व्ही.डी.ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र पावर, पो.ना. नितीन बाविस्कर, पो.ना. गिरीष पाटील, पो.ना. अभिजी सैंदाणे, पोकॉ संदीप माने यांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेत कब्जातील 4 हजार 368 रूपयांची दारू हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. मनोज येऊलकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version