Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेच्या धक्क्याने विवाहिता जखमी

electric shock02 800x445

जळगाव प्रतिनिधी । टि.व्ही. सुरू करण्यासाठी गेलेल्या विवाहितेला विजेचा धक्का लागल्याने जखमी झाल्यात. ही घटना सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्रिभवन नगरात घडली. जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिमा पप्पू जाधव (वय-28) रा. त्रिभवन नगर ह्या सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घरातील टिव्ही सुरू करण्यासाठी पीन इलेक्ट्रीक बोर्डात लावत असतांना विजेच्या धक्क्याचे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. आता प्रकृती स्थिर असून याबाबत शहर पोलीसात नोंद घेण्यात आली आहे.

Exit mobile version