Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर; काँग्रेसला यश

vijay 1561372980

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि काँग्रेस नेते विजय वेडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीनंतर वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार पदभार स्वीकारणार असून त्यांना कोणते खाते मिळणार, याबाबत अद्यापही माहिती समोर आलेले नाही

सोनिया गांधी यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेत विजय वडेट्टीवारांचा तिढा सुटला. वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनीच पुढाकार घेतला होता. सोनिया गांधींसोबत वडेट्टीवारांचं नेमकं काय बोलणं झाले, विजय वडेट्टीवार यांना नेमकं कोणते आश्वासन देण्यात आले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता वडेट्टीवार या नाराजीनाट्यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. विजय वडेट्टीवार दुय्यम दर्जाची खाती दिल्याने नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे वडेट्टीवारांना खातं बदलून मिळणार का, याचीही चर्चा आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेला ‘ब-1’ हा वडेट्टीवारांचा आवडीचा बंगला देऊनही विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात आली. मात्र तरीही वडेट्टीवारांची नाराजी कायम होती.

Exit mobile version