Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी असल्यानेच महसूल मंत्रीपद मिळाले नाही ! : वडेट्टीवार

लोणावळा । मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यामुळेच महसूल मंत्रीपद मिळाले नसल्याचा आरोप करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसच्या ओबीसी चिंतन शिबिरात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यांनी सरकार व स्वत:च्या पक्षाला अडचणीत आणले आहे. आता लोणावळा येथील काँग्रेसच्या ओबीसी चिंतन शिबिरात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करतांना थेट पक्षावरच निशाणा साधला.

या शिबिरात वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याची गरज यावेळी त्यांनी बोलून दाखवली. आज लढलो नाही तर भविष्यात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण जाऊ शकते आपली ताकद फार मोठी आहे आणि ती आपण ओळखली पाहिजे. मी ओबीसी मंत्रालयासाठी निधी मागितला. तर सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. मी विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे महसूलसारखं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटलं होतं. मात्र मिळालं ओबीसी मंत्रालय ! असे म्हणून वडेट्टीवार यांनी आपल्या मनातील नाराजी बोलून दाखविली.

यावर याप्रसंगी उपस्थित असणारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. मकाँग्रेस जातीयवादी पक्ष नाही, धर्मवादी तर अजिबातच नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. त्यामुळे असं काही होण्याचा प्रश्‍नच नाही. वडेट्टीवार यांचं वय त्यांच्या बाजूनं आहे. त्यांच्या हातात असलेलं वय पाहता भविष्यात त्यांना खूप मोठी संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागेल. आगामी काळात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, असे थोरात म्हणाले. मात्र वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्विरोध पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version