Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख बिनविरोध

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा २५७ /८९ जळगावची आमसभा नुकतीच संपन्न झाली. यात जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अमळनेर येथील श्रीमंगळ ग्रह मंदिर हॉल येथे संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष शिवराज उर्फ महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यात संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून कार्यकारीणी देखील जाहिर करण्यात आली आहे. सभेच्या स्थळी जिल्ह्याभरातून तीनशेहून अधिक महिला व पुरुष अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दिली.

या सभेसाठी केंद्रीय कार्यकारणीचे कोषाध्यक्ष वैष्णव, सरचिटणीस सुनंदा निकम, तसेच जुनी पेन्शन हक्क समितीचे राज्य संघटक संजय सोनार, धुळे जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, शिल्पा सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य वि.अधिकारी वसंत बैसाणे यांनी केले. अजय चौधरी यांचे देखील विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सुशील सोनवणे यांनी केले.

केंद्रिय अध्यक्ष शिवराज जाधव यांनी नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असलेले विजय योगराज देशमुख (आरोग्य सेवक-चोपडा) यांना डोक्यावर फेटा परिधान करून अध्यक्ष पदाची घोषणा केली. यात कोषाध्यक्ष पदासाठी प्रेमलता संजय पाटील, वहिदाबी खान, सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर पाटील (पारोळा) कार्याध्यक्ष राजेश कुमावत, हेमंतकुमार कुलकर्णी, प्रशांत पाटील, पल्लवी भारंबे, अरुणा खरात, उपाध्यक्ष जयवंत पाटील, प्रशांत बोरसे, अजित बाविस्कर, पमाबई ईशी, शीतल पाटील, आरती राजपूत,

सचिवपदी देवेंद्र सोंनवणे, सरफराज तडवी, विशाल चौधरी, कैलास पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी पुष्पजीत सोनवणे, तुषार पाटीलसह सरचिटणीसपदी राजश्री वाघोदे, संघटक पदी रूपेश पगार, दिपक पाटील, रामकृष्ण साळुंखे, शितल रोकडे, सुनीता चौधरी, सुवर्णा धनगर, अध्यक्ष – जुनी पेन्शन हक्क समिती राकेश शिंपी, अध्यक्ष – महीला संरक्षण समिती पदासाठी सुवर्णा भोपे, अध्यक्ष – मागासवर्गीय पदासाठी गौतम नन्नवरे, जितेंद्र मोरे, मुख्य सचिव संजय पाटील, ज्येष्ठ सल्लागार श्रीराम पाटील, सचिव संपर्क माधवराव मगर, जयश्री चौधरी यांच्यासह विविध पदावर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version