Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज वाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहरातील पाणीपुरवठ्यास एक दिवस विलंब

tap water

जळगाव प्रतिनिधी । वाघुर पाणीपुरवठ्याशी निगडीत आलेल्या विद्यूत प्रवाहाच्या दुरूस्तीचे काम होणार असल्याने शहरात होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे.

वाघुर उच्चदाब विद्यूत वाहिनीशी निगडीत असलेल्या एमआयडीसीतील 132 केव्ही सबस्टेशनचे दुरूस्तीचे काम असल्यामुळे 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत विद्यूत पुरवठा बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा एक दिवसाचे पुढे ढकलण्यात आले आहे. 9 रोजीचा पाणी पुरवठा 10 रोजी, 10 रोजीची पाणीपुरवठा 11 आणि 11 रोजीचा पाणीपुरवठा 12 रोजी याप्रमाणे होणार आहे. याची शहरातील नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version