Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विदगाव पुलावर अपघात; दोन जण गंभीर

dabhurni news

जळगाव प्रतिनिधी । डांभूर्णीकडून जळगावकडे येत असतांना विदगावच्या तापी पुलावर दुचाकीचा अपघात झाल्याने दोन तरूण गंभीर जखमी झाले असून दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, भरत भिमराव सपकाळे (वय-30) रा. दिनकर नगर, जळगाव आणि शेखर बाळू कोळी (वय-23) रा. जैनाबाद जळगाव यांच्यासह अन्य एकजण डांभूर्णीवरून दुचाकी क्रमांक (एमएच 19, 1716) ने विदगाव मार्गे येत असतांना तापी पुलावर दुचाकीचा अपघात झाला. यात भरत सपकाळे आणि शेखर कोळी गंभीररित्या जखमी झाले असून दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

Exit mobile version