Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अहमद फैजपुरी यांच्या दोन लघुकथांचा समावेश

kavi faizpuri

यावल प्रतिनिधी। जिल्ह्यासह खानदेश व राज्यातील सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक अहमद कलीम फैजपुरी यांच्या या दोन लघुकथांचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उर्दू बी.ए.च्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

अहमद कलीम फैजपुरी (वय-८३) हे मूळ फैजपूर (ता. यावल) येथील रहिवासी असून सध्या ते भुसावळ जि. जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या दोन लघुकथांचा बी.ए. द्वितीय वर्षाच्या उर्दू विभाग पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात समावेश झाला ही बाब फैजपूर शहरवासीयांसह संपूर्ण खानदेशच्या साहित्यिक व उर्दू प्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.उर्दू जगतात जळगाव जिल्ह्यासह राज्यात थोर साहित्यिक अहमद कलिम फैजपुरी यांचे मोठे स्थान आहे. त्यांच्या या कार्याबद्दल खिदमत मिल्लत फाउंडेशन फैजपूरचे अध्यक्ष मुदस्सर नजर मोहम्मद आरिफ यांच्यासह अनेक उर्दू प्रेमी, कवी, साहित्यिक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ते खानदेशी उर्दू रॉयटर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.

Exit mobile version