Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्या नारेकर हिची सीमा सुरक्षा दलात निवड ; आमदारांकडून कौतुक

यावल प्रतिनिधी । रावेर यावल मतदार संघातील व्यासनगरातील भारत मातेची सुकन्या विद्या नारेकर हिचे देशा प्रतीच कर्तव्य बजावण्यासाठी सीमा सुरक्षा बलात निवड झाली आहे. तिच्या ह्या यशाचे कौतुक आमदार शिरीष चौधरी आणी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांच्याकडून करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यावल येथील राहणाऱ्या कु. विद्या नारेकर हिच्या डोक्यावरील लहानपणीच बापाचं छ्त्र हरवले गेलेलं आणि त्यात भर घरात अठराविश्र्व दारिद्र्य… पण ह्या ताईने जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करत तिने यश संपादित केलं. त्यासाठी तिचे आज विशेष असे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. दरम्यान, आपल्या देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचे वृत्त आपणास मिळत असते. यातच पुलवामा सारख्या भ्याड हल्यातील आठवणी येत असतांना शहीद झालेल्या जवानांचा बलिदान दिवस देखील आपण विसरू शकणार नाही.

Exit mobile version