Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुर्‍हाणपूर येथील ‘सिंगर’ स्पर्धेत विधी पाटील प्रथम

रावेर प्रतिनिधी । बुर्‍हाणपूर येथे कला साहित्य सांस्कृतिक मंच तर्फे आयोजित टॅलेंट हंट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सिंगरच्या  रावेर शहरातील विधी पाटील हिने सर्वोत्कृष्ट गायिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बुर्‍हाणपूर येथे आयोजित टॅलेंट हंट तर्फे आयोजित स्पर्धेची ग्रंड फायनल नुकतीच संपन्न झाली. यात सिंगर क्षेत्रात पाचवीचे बुर्‍हाणपूर येथे शिक्षण घेणारी कु विधी प्रविण पाटील हीने प्रथम क्रमांक पटकविला कु वीधी रावेर शहरातील फोटोग्राफर तथा पत्रकार प्रवीण पाटील यांची कन्या असून तीचा सर्वे स्तरातून कौतुक होत आहे.

स्पर्धेत 36 मुलांनी घेतला सहभाग

येथील एका हॉटेल संपन्न  झालेल्या स्पर्धेत 36 मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला यात ज्युनियर गटात सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून कु.विधी पाटील, तर सर्वोत्कृष्ट डांसर मध्ये हितांशी अग्रवाल यांचा प्रथम क्रमांक मिळाला वरिष्ठ गटात सिंगर मध्ये नंदलाल सनांसे गायक मध्ये मोहम्मद सुपर सिनियर गटात डांसर मध्ये दिलप्रीत चीमा सर्वोत्कृष्ट ठरली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला खासदार ज्ञानेश्वर पाटील भाजप जिल्हाध्यक्ष मनोज लधवे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजय रघुवंशी, संस्थापक अध्यक्ष नीलेश महाजन, शिक्षण सह आनंद चौकसे, उमेश जंगले, संदेश माहेश्वरी, अर्चना गोविंदजीवाला, राजेश सावकारे,विकास ठाकूर,सुधाकर महाजन गायन स्पर्धेत परीक्षकांच्या भूमिकेत डॉ.सतीश वर्मा प्राचार्य रागिणी विनयकुमार जोशी खरगोणे, नामदेव भोयटे भारती मालवीय मुंबई, रवी फुलमाळी  विजय महाजन कला साहित्य व सांस्कृतिक मंचाचे संरक्षक ठाकूर वीरेंद्र सिंग चित्रकार राज भावसार,उपाध्यक्ष जिकेश माग्रे, सुनंदा वानखेडे, सचिव ऋषी मुलतकर, सहसचिव प्रिया हसनंदानी, खजिनदार कमलेश पांजराई, अश्विन मुलाटकर, डॉ. कुणाल मालवीय उपस्थित होते.  मंचाचे सूत्रसंचलन दिलीप मोरे आभार जिकेश मगरे यांनी मानले.

 

 

 

Exit mobile version