Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे चित्रफित प्रकाशन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर व तालुक्यातील सन – १९४२ चले जावच्या चळवळीतील सहभाग आणि यातील पाचोरा सैनिकांचे योगदान या चित्रफितीचे स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार तथा पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते चित्रफितीचे रिमोटचे कळ दाबून प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खुशी पटवारी व यस्वी अग्रवाल यांनी देशभक्तीपर गित सादर केले. तर मान्यवरांच्या हस्ते अग्रसेन महाराज व भारतमाता प्रतिमापुजन करून कार्यक्रम सुरूवात करण्यात आली. अग्रवाल समाज व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व एम. एम. महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली पाचोरा स्वातंत्र्य सैनिकांचा स्वातंत्र्य लढ्यातील कार्य व हुतात्मे यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारी चित्रफित तयार केल्याबद्दल ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व त्यांचे सहकारी सागर शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर पाचोरा शहराच्या इतिहासात प्रथमच स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार असलेल्या कुटूंबियांपावेतो अग्रवाल समाज मंडळ यांचे पदाधिकारी निमंत्रण देण्यासाठी पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य सैनिकांचे कुटूंब देखील कार्यक्रमास उपस्थित होते. या सर्व कुटूंबियांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांनी सदरचे चित्रफित पाहून स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती पाचोरेकर्‍यांना सविस्तरपणे प्रथमच बघायला मिळाल्यामुळे उपस्थितीतांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला प्रतिसाद देत देशभक्तीपर घोषणा देवून साद व दाद दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल उपस्थित होते. तर त्यांच्या समवेत व्यासपिठावर पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, न. पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, सचिन सोमवंशी व्यासपिठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन यांनी केले. तर माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, तहसिलदार कैलास चावडे यांनी मनोगत व्यक्त करतांना ते भारावून गेले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अग्रवाल समाज मंडळाचे सिताराम अग्रवाल, अनुप अग्रवाल, दिनेश अग्रवाल, राजेश मोर, लक्ष्मीकांत पटवारी, संजय पटवारी, गोपाल पटवारी, राजेश पटवारी, संजय सावा, रमेश अग्रवाल, पवन अग्रवाल, युवा मंच अध्यक्ष निखिल मोर, रवि मोर, किशन मोर, लौकिक अग्रवाल, अंकित अग्रवाल, योगेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, अजय गिंदोडिया, जितू मोर, नितेश अग्रवाल, राहूल गिंदोडिया, मुकेश अग्रवाल, सौरव सावा, पप्पू मोर, चिंटू पटवारी, अनुराग भारतीया, महिला अध्यक्षा संगिता अग्रवाल, किरण पटवारी, सुशिला अग्रवाल, माया पटवारी, बबिता मोर, शितल निमोदिया, कृष्णा गिंदोडीया, बहूमंडल अग्रवाल, टिना अग्रवाल, मोनिका पटवारी, कल्याणी मोर, श्‍वेता अग्रवाल, मेघा मोर, संगिता अग्रवाल, लिना अग्रवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी यांनी तर उपस्थितांचे आभार सिताराम अग्रवाल यांनी मानले. राष्ट्रगिताच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version