Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली विकासोवर शेतकरी पॅनलचे वर्चस्व

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोरपावली विकास संस्थेचे मा. चेअरमन व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे.

या संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी पॅनलचे नेतृत्व करणारे कोरपावली ग्राम पंचायत चे माजी सरपंच  जलील सत्तार पटेल यांच्या “शेतकरी पॅनलचा ” या निवडणुकीत पॅनलचे सर्व उमेदवार पराभुत झाल्याने दारुण पराभव पत्कारावा लागला आहे. यावेळी राकेश फेगडे यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा निवडणूकीचे निकाल जाहीर होताच आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचीत उमेदवारांनी मतदारांचे घरोघरी जावुन प्रत्यक्ष भेटुन त्यांचे आशीर्वाद घेतलेत.

यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजयुवा मोर्चाचे पदाधिकारी व मावळते चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या  ‘शेतकरी विकास पॅनलच्या’ सर्वच्या सर्व १२ जागा निवडून आल्या.

त्यात सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून राकेश वसंत फेगडे हे सर्वाधिक (३१०)मते मिळवुन विजयी झालेत तर ललित देविदास महाजन (२७६), सुधाकर प्रल्हाद नेहेते (२७४), यशवंत निंबा फेगडे (२६५), वसंत नामदेव महाजन (२६४), दत्तात्रेय लीलाधर महाजन (२५४), इम्रान शकील पटेल (२४५) शरद अभिमान पाटील (२३७ ), महिला राखीव मतदारसंघात जयश्री वासुदेव नेहेते (२८३), सुलोचना रवींद्र जावळे (२४६) इतर मागास प्रवर्ग गटात महिंद्र दिनकर नेहते (२८२) मते मिळवून सर्व उमेदवार विजयी झाले.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणुक अधिकारी म्हणून एम. पी. भारंबे यांनी काम पाहिले. या सोसायटीचे ४६७ मतदारांपैक्की त्यापैकी ४३५मतदारांनी निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Exit mobile version