Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यात भाजपाचा विजयी जल्लोष

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच जाहीर झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले. मध्य प्रदेश मध्ये सत्ता राखली, तर राजस्थान व छत्तीसगढ मध्ये काँग्रेसला चारी मुंड्या चीत करीत सत्ता काबीज केली. पक्षाने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाचा आनंद सावदा येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारत माता की जय क्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, राष्ट्रीय परिषदेचे डॉ अतुल सरोदे, शहराध्यक्ष जे के भारंबे, माजी शहराध्यक्ष पराग पाटील, संजय चौधरी नितीन खरे, महेश बेदरकर, पंकज बेदरकर, आकाश भोरटक्के, भारत चव्हाण, राजेश महाजन, जितेंद्र गाजरे, भैया चौधरी, नकुल बेंडाळे, प्रांजल वाघुळदे,निखिल येवले, सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version