Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिजाऊ नगरात उभी मोटारसायकल पेटविली; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जिजाऊ नगरात घरासमोर लावलेली मोटारसायकल पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. मोटारसायकल जळून खाक झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावखेडा शिवारातील जिजाऊ नगरातील रहिवाशी योगेश रविंद्र कोळी (वय-३०) यांची ही मोटारसायकल आहे. योगेश कोळी हे भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. भाजीपाला ने आण करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीक्यू ७७६९) क्रमांकाची मोटारसायकल आहे. ६ जून २०२१ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. त्यानंतर ते जेवणासाठी निघून गेले. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल पेटवून दिली. हा प्रकार रात्री ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. शेजारी राहणाऱ्या रहिवाश्यांनी ही आग विझविली. योगेश कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.

Exit mobile version