Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जादा दराने खत विक्री केल्यामुळे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

sambhaji thakur

sambhaji thakur

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा व अमळनेर तालुक्यातील कृषि केंद्राची तपासणी केली असता कृषी केंद्र चालक जादा दराने खत विक्री करतांना आढळून आल्यामुळे चोपडा व अमळनेर या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरु असून खरीप हंगामात खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठयाप्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागते. दरम्यान कृषि विभागाने फसवणूकीचे प्रकार घडू नये. म्हणून विशेष लक्ष ठेवले असून, शेतकरी बांधवांची फसवणूक केल्यास कृषि केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचा इशारा कृषि विभागाकडून देण्यात आलेला होता.

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासण्या सुरु असुन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, यांनी चोपडा व अमळनेर तालुक्यातील कृषि केद्राची तपासणी केली असता कृषि केंद्र चालक जादा दराने खत विक्री करतांना आढळून आल्यामुळे मे. राजप्रभा फर्टिलायझर, चोपडा, मे. अग्रवाल ॲग्रो एजंसी, चोपडा व मे. शाह एजन्सी, अमळनेर या 3 विक्रेत्यांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी दि. 24 जून, 2022 रोजी सुनावणी घेऊन खत विक्रेत्यांच्या परवान्यावर कडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केलेले आहेत.

खरीप हंगाम 2022 मध्ये जिल्हयात शेतकरी बांधवांना जादा दराने विक्री किंवा इतर अनावश्यक खतांची लिंकीग करीत असल्याचे आढळुन आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. 084689 09641 व दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version