Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल-चिंचोली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा संताप; सा.बां.विभागाचे दुर्लक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्ग हा खेड्डेमय झाले असून यावल-चिंचोली खड्ड्यांमुळे वाहन चालविणे जिकरीचे काम झाले आहे. यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहे.

यावल ते चिंचोली सुमारे २० किलोमिटरच्या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेक निरपराधांचा जिव गेला असुन यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गंभीर प्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची वाहनधारकांसह नागरीकांमध्ये बोलले जात आहे. यावल ते चिंचोली दरम्यानच्या बुरहाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन या रस्त्यावर ठीक ठीकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनधारकांचे जिव धोक्यात आले असुन मागील आठच दिवसात वाहनाच्या झालेल्या दोन अपघातामध्ये जळगाव येथील व्यवसायीस पतीसह पत्नीचा अपघात झाला होता. या मार्गावरील रस्त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले की यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्च करून थातुर मातुर पद्धतीने रस्ते दुरुस्त करण्यात येत असते, असे हे देखाव्याचे कारभार अनेक वर्षा पासुन सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या रस्त्यांच्या अवस्थेते भोंगळ व भ्रष्ट कारभार जबाबदार असल्याचे बोलले जात असुन, या मार्गावरील रस्त्याच्या गंभीर प्रश्नावर वरिष्ठांनी गांर्भीयाने लक्ष केन्द्रीत करून चांगल्या ठेकेदारा कडुन मार्ग गुणवत्तापुर्ण तपासणी करून या मार्गाचा प्रश्न कायमचा मार्गी लावुन वारंवार होणाऱ्या अपघातातुन वाहनधारकांची सुटका करावी अशी मागणी होत आहे .

Exit mobile version