Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोमांस घेवून जाणाऱ्या वाहनाला संतप्त जमावाने पेटविले

WhatsApp Image 2019 04 04 at 21.00.55

WhatsApp Image 2019 04 04 at 21.00.55

रावेर (प्रतिनिधी)। रसलपुर येथुन बेकायदेशीररित्या गौमांस बुऱ्हाणपूरकडे वाहून नेतांना चार चाकी गाडीतील काही गोमासाची पिशवी खाली पडल्याने जमलेल्या जमावाने टाटा मॅजिक गाडी ही चारचाकी गाडी पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील रसलपुर येथे आज सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर दोन जणांना अटक सुध्दा केली आहे.

 

 

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक गाडी क्रमांक (एमपी 68 पी 137)चा ड्रायव्हर शेख वसीम शेख इस्माईल (रा मदिना कॉलनी रावेर) हा गाडीत रसलपुर गावातून गाडीमध्ये गोमास घेऊन वेगाने निघाला गावात असलेल्या स्पीड ब्रेकर वरुन गाडी जोरात गेल्याने गाडिचा मागील दरवाजा उघडला व त्यात असलेली गोमांसाची पिशवी खाली रस्त्यावर पडली याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळाकडे जमाव वेगाने जमा होऊन गाडीजवळ आले व लोकांच्या भावना संतप्त झाल्याने टाटा मॅजिक गाडी पेटवून दिली त्यात गाडीत जळून पूर्ण खाक झाली आहे.

घटनास्थळी पोलिस अधीक्षकांची भेट
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रसलपूर येथे पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तसिलदार उषारानी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळढे, आदीनीं रसलपुर येथे भेट देऊन पाहणी केली.

पोलिस घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामदास वाकुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे, फौजदार अमृत पाटील व सहकारी यांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके अय्यूब पैलवान यांनी लोकांशी संवाद साधत शांततेचा आवाहन पोलिसांनी घटनास्थळी पोलीस तातडीने पोहोचल्याने मोठा अनर्थ या गावावरील टळला आहे.

दोन जन अटकेत
रावेर पोलीस स्टेशनला दोन वेग-वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गाडी चालक शेख वसीम, गाडी मालक शेख शकूर उर्फ कालू रा बंडू चौक यांना अटक केली आहे. तपासासाठी तीन पथक गठीत करण्यात आले आहे दरम्यान रसलपुर गावात शांतता असुन पोलिस बंदोबस्त तैण्यात करण्यात आले आहे.

Exit mobile version