Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोघांना सापाने तर एकाला विंचवाने घेतला चावा

sap

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. शेतात काम करत असताना वेगवेगळ्या घटनेत दोघांना सापाने चावा तर तिसऱ्या घटनेत एकाला विंचूने चावा घेतला असून तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनंत हिरालाल पाटील (वय 24) रा. वडगाव ता. पाचोरा आणि रोशन अनिल तवडकर (वय 21) रा. वराड, ता. जळगाव हे दोघे शेतात काम करत असताना दोघांना सापाने चावा घेतला, तर कुवरसिंग गुलसिंग पावरा (वय 25) रा. आनोदा खुर्द ता. जळगाव याला विंचूने चावा घेतला आहे. या तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version