Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालोद येथील ग्रामसेवक तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले आदिवासी कुटुंबातील राजु तडवी यांनी आपला वाढदिवसानिमित्त समाजहित व माणुसकीची जाणीव ठेवत  विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केले असुन त्यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौत्तुक केले जात आहे. 

यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले आदिवासी कुटुंबातील राजु तडवी यांनी आपला वाढदिवसासाठी होणारी अनेक अनावश्यक खर्च टाळुन अतिशय साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. सद्या संपुर्ण देशात आपल्या राज्यात व आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे लागलेली सर्वत्र संचारबंदी यात अनेक हातावर पोट भरणारी कुटुंब ही रोजगार व कामधंदे अभावी आर्थिक संकटात ओढवलेली गेली आहे. अशा संकटाच्या समयी समाजाला आपले देणे म्हणुन सामाजिक कर्तव्याची जाणीव राखुन ग्रामसेवक राजु तडवी यांनी आपल्या वाढदिवसासाठी होणारे सर्व खर्च टाळुन यातुन मालोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी गावातील गोरगरीब व गरजु महीलांना स्वखर्चातुन वस्त्र, मास्क, आणि सॅनिटायझर वितरीत केले. तसेच त्यांनी वृक्षारोपण देखील केले.

तसेच शासनाच्या अपंगांना पाच टक्के निधीतुन दहा अपंग महीला आणी पुरूषांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे धनादेश वाटप केलीत व आजच्या काळात सर्वाधिक अत्यंत गरजेचे असलेली पर्यावरणाचे व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी विविध वृक्षांचे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण केले अशा विविध समाजहिताच्या दृष्टीकोणातुन लक्ष वेधणारे मौल्यवान कार्य करून शासनाचे सर्व नियम पाळत आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या उपक्रमानी साजरा करून एक आदर्श निर्माण केले आहे. 

याप्रसंगी मालोद या आदीवासी गावात संपन्न झालेल्या या आदर्श निर्माण करणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, ग्रामपंचायंत विस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम तळेते, ग्रामसेवक हितेन्द्र महाजन, ग्रामसेवक बाळु वायकोळे, कोरपावलीचे अविनाश भालेराव, मालोदच्या सरपंच हसिना तडवी, उपसरपंच हुसेनाबाई तडवी, ग्राम पंचायत सदस्य जोहराबाई तडवी, बिस्मिल्ला तडवी, अरब तडवी, उषाबाई बारेला, सुनिता पाटील, संजय तडवी, अकबर तडवी, बिस्मिल्ला तडवी, रमाबाई बारेला यांनी या सामाजीक व विधायक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

 

Exit mobile version