जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्त डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे बुधवार, ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी विविध आजारांवर फिजीओथेरपी कशी उपयुक्‍त आहे, याचे महत्व पटवून देण्यात आले असून त्याबद्दल ७५ रुग्णांना फिजीओथेरपी देण्यात आली.

जागतिक फिजीओथेरपी दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे डॉ.उल्हास पाटील रक्‍तपेढी येथे रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.निखील पाटील, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी यांच्यासह ३२ विद्यार्थ्यांनी रक्‍तदान केले. तसेच बुधवार, ८ रोजी सकाळी १० वाजता डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भौतिकोपचाराबाबत मार्गदर्शन आणि उपचारांची माहिती देण्यात आली. सर्वप्रथम एमओ डॉ.चेतन अग्निहोत्री यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले, तसेच तेथील सर्व स्टाफचेही गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांनी भौतिकोपचाराबाबत उपस्थीतांना माहिती दिली. तसेच ज्यांना शारिरीक व्याधी आहे ज्या फिजीओथेरपीने बर्‍या होवू शकतात अशा ७५ रुग्णांना थेरपी देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.अमित जयस्वाल, डॉ.साकीब सैय्यद, डॉ.अनुराग मेहता, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.भवानी राणा, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन हे उपस्थीत होते. यावेळी डॉ.केतकी सकळकर, डॉ.तेजस्विनी व्यंकटवार, इंटर्न श्रृती चौधरी, मैथिली महाजन, श्रृती मुकूंद, राजश्री पाटील आदिंनी थेरपी दिली.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मार्गदर्शन 

जळगाव येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जागतिक फिजीओथेरपी दिनानिमित्‍त डॉ.निखील पाटील यांनी फिजीओथेरपीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.निखील पाटील, डॉ.वैशाली, कुणाल सावंत, चिन्मय वाणी, स्नेहा तिवारी, उत्कर्ष यांचा डीडीआरसीतर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, समाज कल्याणचे भारत चौधरी, डीडीआरसीचे गणेशकर आदि उपस्थीत होते. यावेळी केंद्रातील दिव्यांगांना फिजीओथेरपीचे उपचार देण्यात आले.

Protected Content