Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या मतदार जागृती कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मतदानाच्या संदर्भातील व हक्का विषयी जागृती व्हावी ,सज्ञान विद्यार्थ्यांनी  मतदार यादी मध्ये वेळेवर राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होवुन आपले नाव नोंदणी करावी तसेच आपल्या परिसरातील राहणाऱ्या लोकांमध्ये मतदार जागृती करावी या साठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात व्याख्यान, मतदार नोंदणी अर्ज वाटप, निबंध स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा व प्रतिज्ञावाचन असे उपक्रम राबविण्यात आले. सदर उपक्रम प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

सर्व कार्यक्रमांचे आयोजन उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील यांनी केले. प्रा .एम.डी.खैरनार ,डॉ. सुधा खराटे,डॉ.एस.पी.कापडे,  प्रा. विकास पाटील ,डॉ. पी .व्ही .पावरा, प्रा. एस. आर .गायकवाड, मिलिंद बोरघडे ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

 

 

Exit mobile version