Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मू.जे.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्याजयंतीनिमित्त व्याख्यान, भीमगीत गायन व काव्यवाचन कार्यक्रम घेण्यात आले.

 

या कार्यक्रमात प्रथमतः भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व त्यानंतर त्रीशरण, पंचशील व बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कविवर्य शशिकांत हिंगोणेकर हे होते. यावेळी कविवर्य शशिकांत हिंगोणेकर यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले.  डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेली पत्रे यांचे संदर्भ देत त्यांचे विचार, कार्य व त्यांच्या जीवनातील आठवणीना उजाळा दिला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सं.ना.भारंबे हे होते. कार्यक्रमात ऋषिकेश वाघ, रोहिणी गवळी, सम्यक मेढे, चंदन भामरे, दिपक नाईक, अविनाश तायडे, विशाल लोखंडे, शुभम मनुरे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील भीमगीते सादर केली. त्याचं बरोबर गोपाळ बागुल, कुमुदिनी पाटील शाल लोखंडे, शुभम मनुरे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरील भीमगीते सादर केली. त्याचं बरोबर गोपाळ बागुल, कुमुदिनी पाटील. या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.. या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.

 

याप्रसंगी भाषा प्रशाळा संचालक प्रा.डॉ. भूपेंद्र केसुर, सामाजिक शास्त्रे प्रशाळा संचालक प्रा. देवेंद्र इंगळे, कुलसचिव जगदीप बोरसे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रमणी लभाने, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संजय हिंगोणेकर, प्रा.राजीव पवार, डॉ. अनिल क्षीरसागर, डॉ. मनोज महाजन, प्रा. वसावे, प्रा.कुणाल वानखेडे, प्रा.राहुल सुरळक, प्रा.सगळगिळे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ.विलास धनवे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

 

Exit mobile version