Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात उपमुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

आगामी निवडणूकांमध्ये रावेर तालुक्यात जास्तीत-जास्त जागा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या निवडणून  आणून राष्ट्रवादीची ताकद रावेर तालुक्यात वाढवयाची म्हणुन कार्यकर्त्यनी सज्ज राहण्याचे आहवान राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केले आहे. 

यात प्रामुख्याने गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्ष लागवड करण्यात आली, व केक कापून परिसरात लड्डू वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यकर्ताना मार्गदर्शन करतांना तालुकाध्यक्ष श्री चौधरी बोलत होते. रावेर पंचायत समिती सदस्य दिपक पाटील रावेर शहर अध्यक्ष महेमूद शेख,युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,पंकज वाघ,,युवक शहर अध्यक्ष प्रणीत सरपंच रूपेश पाटील आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

Exit mobile version