Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. विशेष आकर्षण म्हणून डॉ. जगदीश पाटील सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर यांच्या कडून परिवर्तन चौक मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला.

विविध वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले होते. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका व राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेसह मावळे, व इतर विद्यार्थी कलाकार यांनी आपला सहभाग नोंदवला होता. ढोल ताशाच्या गजरात परिवर्तन चौका मधून तहसील मार्गे रॅली काढण्यात आली होती. त्यात बहुसंख्येने मुक्ताईनगर तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version