Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम; पारितोषिक वितरण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महाबळातील मायादेवी नगरात स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

शहरातील स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संतोष वाणी मॅनेजर, जळगाव पिपल्स बँक सुरज जहांगीर चौधरी यांचा  मनोज येवले यांच्याहस्ते करण्यात आला. या मान्यवरांच्या उपस्थितीत सीनेगीत स्पर्धेत माही सुर्वे, वैष्णवी रविंन्द्र कुलकर्णी, किरण प्रकाश महाजन यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ब्युटीफुल फोटो स्पर्धेत अर्चना येवले, सुनीता अग्रवाल व कविता बावस्कर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी सिध्दार्थ जगताप, सोनी ज्ञानेश्वर पाटील, उज्वल महेन्द्र सिंघवी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले. आयोजन सुञसंचालन स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष पल्लवी भोगे (पाटील) यांनी केले. यशस्वीतेकरिता वर्षा सगणे, दिव्या मोरे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

 

 

Exit mobile version