Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हसावद येथील स्वामी समर्थ केंद्रात विविध कार्यक्रम !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे अखिल भारतीय गुरूकुल पीठ यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरूवार २८ एप्रिल रोजी सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरूकुल पीठ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बाल संस्कार विभाग, विवाह संस्कार विभाग, पशुसंवर्धन, यज्ञ प्रशिक्षण, विवाह प्रबोधन, स्वयंरोजगार विभाग, इंजिनिअरींग शास्त्र विभाग, वकील सल्लागार विभाग, पर्यावरण पूरक विभाग यासह इतर विभागाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. आयोजित कार्यक्रमात जवळपास २०० जणांनी सहभाग  नोंदविला होता.

कार्यक्रमाच्या दैनंदिनीमध्ये सकाळी भोपाळी आरती, महिला सेवेकरी भक्त यांना आलेला अनुभव, पुरूष सेवेकरी भक्त यांना आलेला अनुभव या ठिकाणी सांगण्यात आला. स्वामी समर्थ मार्ग म्हणजे अनुभूमीचा मार्ग आहे. या ठिकाण बाहेरील जनसामन्य ग्रामस्थांना होणारा आजाराचा त्रास देखील कायमचा बरा होतो अशी माहिती येथील केंद्र प्रमुख अभिलाष पाटील यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र भांडारकर, हितेश पाटील, किशोर बडगुजर, समाधान कुमावत, मनोज चौधरी, निता तिवारी, मंगला पाटील, दत्तात्रय दंडगव्हाळ, दिव्या चौधरी, भास्कर कुंभार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version