Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांनी आज विविध मागण्या संदर्भात भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन दिले स्वस्त धान्य दुकानदार यांच्या प्रमुख मागण्या अश्या आहेत की

1) दुकानदार वाटपाचे मार्जिन 150 रु वरून 300 करून मिळणे बाबत 2)माहे डिसेंबर 2022 चां चलन भरणा व मार्जिन देय रक्कम तात्काळ मिळावी 3) दर महिन्याला वाटप मार्जिन संबंधित दुकानदार च्या खात्यात ताबडतोब वर्ग करण्यात यावा 4) तसेच वाटप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या ई-पाॅस मशीन नवव्या देण्यात याव्या यांच्या सह विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून संपावर जाणार अश्या संदर्भातील आज भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले यावेळी स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे भडगाव अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष आनंदाराव सोनवणे, सचिव लक्ष्मण पाटील तसेच नथु अहिरे, संजय भोसले, धनराज शिरसाठ यांच्या सह भडगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

Exit mobile version