Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावखेडा येथे अस्कॅड योजनेंतर्गत शिबिर

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्र पुरस्कृत अस्कॅड योजनेअंतर्गत माहिती प्रशिक्षण संपर्क मेळावा व पशु आरोग्य शिबिर पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव, पंचायत समिती पाचोरा व पशुवैद्यकीय दवाखाना वरखेडी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सावखेडा येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या प्रथम नागरिक सुमन वाघ सरपंच हया होत्या. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राजेश सोनवणे, उपसरपंच संभाजी तडवी, तुकाराम पाटील, मोतीलाल परदेशी, वसंत सोनार, मोतीलाल परदेशी, एकनाथ वाघ, साधना पाटील, शोभा पाटील, शेखर पाटील, छोटू न्हावी व ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी पाचोरा पंचायत समिती, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. आर महाजन यांनी जनावरांच्या विविध आजाराबाबत माहिती दिली तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. सुजाता सावंत यांनी गाभण जनावरांची निगा कशी घ्यावी याबाबत माहिती दिली. डॉ. संदीप पाटील (लोहटार) यांनी ऑक्झलेट विषबाधा बाबत माहिती दिली. जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिला सरपंच सुमन वाघ, साधना पाटील, शोभा पाटील व उपस्थित महिला पशुवैद्यक डॉ. सुजाता सावंत डॉ. सायली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

शिबिरात तांत्रिक कामगार डॉ. महाजन (पाचोरा), डॉ. निलेश बारी (नांद्रा), डॉ. सुजाता सावंत (पाचोरा) डॉ. सायली देशपांडे (गिरड), डॉ. रवींद्र टेंम्पे (वरखेडी), डॉ. मडावी (सातगाव डोंगरी), डॉ. गौतम वानखेडे (आंबेवडगाव), डॉ. संदिप पाटील (लोहटार) यांनी केले. याप्रसंगी उपस्थिती सर्व खाजगी पशुवैद्यक डॉ. रवींद्र पाटील (लोहारी), डॉ. संदीप परदेशी, डॉ. चेतन पाटील, डॉ. दिनेश पाटील, डॉ. प्रतिक पाटील, डॉ. दिपक राजपूत, डॉ. सागर राजपूत, डॉ. भुषण पाटील (वेरुळी), डॉ. दिपक पाटील करमाड) यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र टेम्पे (वरखेडी), बाळू पाटील, मोहन परदेशी, प्रवीण महाले व दुध सोसायटीचे सचिव श्रीराम पाटील यांनी यशस्वीरित्या नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप पाटील लोहटार) यांनी केले.

 

 

Exit mobile version