Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यावरणी दिनानिमित्त भुसावळात विविध उपक्रम

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील अर्जुना संस्था, होमगार्ड बांधव आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जागतीक पर्यावरणी दिनाच्या निमित्ताने वृक्षदान आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन हा जागतिक पर्यावरण दिवस असला तरी पर्यावरण प्रेमीं साठी  प्रत्येक दिवस पर्यावरणा साठीच असतो  आताची परिस्थिती बघता वृक्षारोपणा सोबतच रक्तदानाची नितांत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शहरातील अर्जुना संस्था, होमगार्ड बांधव, आणि वन्यजीव संरक्षण संस्थातर्फे वृक्षदान आणि रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात अनेक स्वयंसेकांनी रक्तदान केले  रक्तदान केलेल्या युवा युवकांना इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने  प्रत्येक उपस्थित व्यक्तींना वृक्ष वाटप करण्यात आले व वृक्ष जगवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली वृक्षांमध्ये प्रमुख भारतीय वृक्ष निम,पिंपळ, वड, जांबुळ, उंबर इत्यादी स्थानिक वृक्षान चा समावेश होता. वृक्षांची रोपे रेडक्रॉस सोसायटी, आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.

कार्यक्रमात वन्यजीव संरक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष स्कायलेब डिसुझा, अलेक्सेंडर प्रेसडी, माजी उपाध्यक्ष सतीश कांबळे, रोहित श्रीवास्तव , धीरज शेकोकारे, गौरव शिंदे, राहुल आरक .अर्जुना संस्थे चे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी . रावळ , यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाला योगिनी चौधरी, चेतन बोरनारे, भगवान पाटील, रवींद्र पाटील, अक्षय राजनकर यांनी परिश्रम घेतले.

रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे, अनेक वेळा अपघात सापडलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. तसेच रक्तदान केल्याने शरीरातील नवीन रक्त निर्मिती होते.  म्हणून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे  असे आवाहन एन.पी. रावळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सांगितले. लोकांनी झाडे लावताना विदेशी वृक्ष न लावता स्थानिक वृक्ष लागवड करावी. निम, पिंपळ, वड , उंबर ही झाडे जास्तीत जास्त प्राणवायू उत्पन्न करतात. विदेशी वृक्ष लागवडी मुळे स्थानिक पातळीवर निसर्गाचा व्यास होते म्हणून शक्य तितके स्थानिक वृक्षा रोपण करावे. 

स्कायलॅब डिसुझा वन्यजीव संरक्षण संस्था कार्यधक्ष, भुसावळ यांनी वृक्षमित्रांना संबोधीत केले, वाढते प्रदूषण लक्षात घेता वृक्ष लागवड  व  त्यांची योग्य काळजी घेणे  निसर्गाच्या दृष्टी ने अत्यंत गरजेचे आहे, म्हणून प्रत्येक व्यक्ती ने किमान एकतरी झाड लावावे व त्याची योग्य ती काळजी घेऊन प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस समजून पर्यावरणास हातभार लावावा असे वृक्षमित्र धिरज शेकोकारे यांनी आभार प्रदर्शन वेळी मत व्यक्त केले .

Exit mobile version