वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना दिपनगर वीज निर्मिती केंद्रात कामावर घेण्यासाठी आज तिरंगा आंदोलन करण्यात आले. वरणगाव शहर सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने हे आंदोलन ५०० मेगा वॅट प्रकल्पाच्या गेटवर करण्यात आले. तीन तास चाललेल्या या आंदोलनात युवक अत्यंत आक्रमक झाले होते. जोपर्यंत आम्हाला कामावर घेणार नाही तिथपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशा प्रकारचं आक्रमक पवित्र घेऊन घोषणाबाजी सुरू होती.
वरणगाव शहरातील १०८ फूट तिरंगा राखेच्या प्रदूषणामुळे बाधित होत असतो. तसेच वरणगाव शहरातील नागरिकांना प्रदूषणामुळे भरपूर त्रास होत आहे. त्यावर प्रशासनाने उपाययोजना करून आरोग्य मिळावे घेण्यात यावे, वरणगाव शहरासाठी सीएसआर निधी मंजूर करण्यात यावा या मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे वरणगाव शहराध्यक्ष नाना चौधरी सचिव मयूर शेळके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिपनगर वीज प्रशासनाचे प्रभारी अभियंता आर. एन. साळवे यांनी २० फेब्रुवारीला मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचे व त्यात जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत व पुढील मागण्या कशा पद्धतीने मान्य करण्यात येतील यासाठी तातडीने आम्ही आठ दिवसात उपाययोजना करून कार्यवाहीची हमी दिली.
या आंदोलनात वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट ए. जी. जंजाळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, मुस्लिम अन्सारी, राहुल जंजाळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, संतोष कश्यप, भाजपाचे गोलू राणे, रामभाऊ माली, तुकाराम कोळी, दादू पालवे, योगेश माळी, कुणाल बोदडे, पद्माकर बोडळे, बाळू बोदले, कमलाकर मराठे, दुर्गेश राजपूत, मुस्लीम अंसारी, दीलकश अंन्सारी, अनिल काळे, नितीन गोसावी, मयूर शेळके, राजू बोडले, ज्येष्ठ नेते तुकाराम कोळी, गणेश चौधरी, गोलू राणे यांच्यासह असंख्य तरुण उपस्थित होते.