Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावच्या शिवसैनिकाने स्वीकारले सहा गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व !

varangaon shivsena programme

भुसावळ प्रतिनिधी । शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वरणगावचे शिवसैनिक निलेश ठाकूर यांनी सहा गरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकरले.

शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाभरात निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण केली आहे. यात वरणगाव येथील कट्टर शिवसैनिक निलेश ठाकूर यांचादेखील समावेश आहे. त्यांनी दि १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वरणगाव येथील सिद्धेश्‍वर नगरात असणार्‍या जि. प. मराठी मुलांची शाळा येथील सहा विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठीचे पालकत्व स्वीकारून नवीन आदर्शन घालून दिला आहे. त्यांनी याबाबत संबधीत शाळेत कागदपत्रांची पूर्तता केली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड मनोहर खैरनार,भुसावळ तालुकाप्रमुख समाधान महाजन, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, किशोर कोळी, शिवा भोई यांच्यासह शिवसैनिक व शिक्षक मंडळी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड मनोहर खैरनार यांच्या समोर आपल्या अडचणींचा पाढा वाचला. यावर चंद्रकांत पाटील यांनी समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.

Exit mobile version