Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेळ्यांसोबत आले हरीण; वन खात्याने सुरक्षित सोडले !

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी | येथील भवानीनगरातील व्यक्तीच्या चरायला गेलेल्या शेळ्यांसोबत एक हरीण त्यांच्या घरी आले. याची माहिती वन खात्याला दिल्यानंतर आज या हरीणाला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, वरणगाव येथील भवानीनगर मधिल रानात चरायला गेल्या बकर्‍या घरी परतत असताना त्यांच्यासोबत एक हरण देखील गावात पोहोचले होते ही बाब लक्षात येताच हरिण वन कर्मचार्‍यांच्या मदतीने पुन्हा जंगलामध्ये सोडण्यात आले आहे.

वरणगाव लगतच असलेल्या आयुध निर्माणी परिसराला लागून जंगल आहे. या जंगलात हरिण, सांबर, तरस. मोर. रानडुकरे यांच्यासारख्या वन्य प्राण्यांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील एक हरण गावात परतणार्‍या शेळ्यांसोबत भवानीनगर येथे येऊन पोहोचले. यानंतर लोकांना पाहिल्याने सैरभैर होऊन ते एकाच्या घरात घुसले. यामुळे त्याच्या पायाला व तोंडाला खरचटले. यावेळी भवानी नगरमधील तरुणाने त्याला पकडून त्याला प्राथमिक उपचार केले. या दरम्यान वनपाल ललित गवळी यांना कळविण्यात आले. त्यांनी लगेचच भवानीनगर गाठून मालवाहू वाहनाने जंगलामध्ये सुरक्षित स्थळी हरणाला सोडून दिले आहे.

Exit mobile version