Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वनकोठे येथील जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वनकोठे गॅसवर पाणी तापविण्यासाठी ठेवलेले भांडे उतरवितांना साडीच्या पदराने पेट घेतल्याने या आगीत 90 टक्के भाजलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला

याबाबत माहिती अशी की, सरला विजय राठोड (वय-31) रा. वनकोठे ता.एरंडोल ह्या 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता आंघोळीला पाणी तापविण्यासाठी गॅसवर पातेले ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर सरला यांना पाणी गॅसवरून खाली उतरवत असतांना साडीच्या पदरने पेट घेतला. यात त्या 90 टक्के भाजल्या गेल्या. ही घटना घडली त्यावेळी त्यांचे पतीन विजय सुकलाल राठोड हे घराच्या बाहेर उभे होते. त्यांनी धाव घेतल लागलेली आग विझविण्याचा प्रयत्नात देखील 10 टक्के भाजले गेले. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सकाळी विवाहिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पती, मुलगा आणि दोन मुली असा परीवार आहे.

Exit mobile version