वंचित बहुजन आघाडीचे रास्ता रोको आंदोलन (व्हिडीओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढू नये या मागणीसाठी शनिवारी २६ नोव्हेंबर रेाजी दुपारी १२ वाजता संविधान दिनी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जी.एस.मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ठिय्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्ते यांनी आकाशवाणी चौकात येवून थेट रस्ता रोको आंदोलन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य सरकारने गायरान जमीनीवरील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यास राज्यभरातील अडीच ते तीन लाख अथवा त्याहून अधिक कुटुंब व जवळपास १२ ते १५ लाखांहून अधिक लोक बेघर होऊ शकतात. परिणामी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्‌भवणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७१६ अतिक्रण धारक कुटुंब ज्यांची एकुण ४५ हजार लोकसंख्या असल्याने अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी बेघर होवून रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून नये या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडच्या वतीने शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मोर्चा काढून आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आकाशवाणी चौकात आंदोलकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी थेट हायवेवरच बसून त्यांच्याशी चर्चा करून समस्येचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्या शमीभा पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, महासचिव दिनेश इखारे, वैभव शिरतुरे, जितेंद्र केदार, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, माजी जिल्हाध्यक्ष विजय पवार, उपजिल्हाध्यक्ष ललित घोगले, रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे, रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाडे, यावल तालुका महासचिव सुजित मेघे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content