Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले अजितदादांचे स्वागत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी विरोधीपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे औक्षण करत पाचोरा नगरीत स्वागत केले आहे.

अजितदादा पवार यांचा आज जळगाव जिल्हा दौरा आहे. यावेळी सुरूवातीला त्यांनी चाळीसगाव शहरात कार्यकर्त्यांशी भेट घेवून संवाद साधला त्यानंतर थेट पाचोरा शहरात सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. शहरात दाखल होण्यापुर्वी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी अजितदादाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्या समस्या व विविध विषयांबाबतचे अजित पवार यांना निवेदनही दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समवेत अजित पवार हे कार्यक्रमस्थळी रवाना झाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत त्यांना निर्मल सिडस्‌ कंपनीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात माजी आमदार आर. ओ. तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरणा संदर्भातही माहिती देण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी अजित पवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.

Exit mobile version