Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इडी नोटीस मुद्द्यावर वडेट्टीवारांचे भाजपला आव्हान

नगर वृत्तसंस्था । भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की जे पेराल ते उगवेल आणि वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा ओबीसी नेते, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिला. 

ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय वडेट्टीवार नगरला आले आहेत. खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजप हा मूळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे. त्यांना अन्य घटकांशी काहीही देणेघेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते.’

‘आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, आम्ही त्याला समोरे जाऊ. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की येथे कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही. दिवस बदलत राहतात.  हे लक्षात ठेवावे, असा इशाराही व़डेट्टीवार यांनी दिला.

 

 

Exit mobile version