Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदाड येथे लसीकरण शिबिर उत्सााहात

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील शिंदाड येथे लसीचे एक हजार डोस उपलब्ध झाले असून शिबीर आयोजन करण्यात आला होते. तथापि, गावातील व आसपासच्या ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लसीकरणासाठी डॉ. मयुर पाटील व त्यांची संपूर्ण टीम, गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका उपस्थित होत्या. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष हिलाल पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती अरुण तांबे, सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, माजी सरपंच इंदल परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडू चौधरी, अशोक धोबी, तुषार लोधी, चुडामण भोई, हरचंद चौधरी ग्रामपंचायत सदस्य विनोद तडवी, तकदीर तडवी, डॉ. राजु लोधी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Exit mobile version