Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकदेवळा येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

पाचोरा प्रतिनिधी । देशभरात कोरोना लसीकरणावर भर दिला जातोय. त्यासाठी १०० टक्के लसीकरणाच उद्दिष्टही ठेवलं जात आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील आरोग्य उपकेंद्रात आज कोरोना लसीकरण करण्यात आले.

यावेळी सुमारे ११० नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे. खडकदेवळा येथील आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत सुमारे पाच गावे आहेत. या गावातील ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच खडकदेवळा येथील युवा नेते बापु पाटील यांनी देखील लसीकरण करुन त्याव्दारे परिसरातील नागरिकांनी देखील जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे आणि कोरोना लसीकरण बाबतीत असलेल्या गैरसमज दूर करुन लसीकरण करुनच घ्यावेत, अशी जनजागृती करुन आवाहन केले आहे. यावेळी कोरोना लसीकरण मोहिमेत डॉ. गोरखनाथ गोराडे, आरोग्य सेवक जितु चव्हाण, आरोग्य सेवक बी. एल. गोसावी, आरोग्य सेविका आर. एस. वजीरे आदींनी परिश्रम घेतले आहेत.

 

 

 

Exit mobile version