Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दीडशे रूपयात लस द्या, अन्यथा आंदोलन : प्रकाश आंबेडकर

 

पुणे  प्रतिनिधी । जगात कोरोनाची लस ही स्वस्तात मिळत असतांना भारतात महाग कशासाठी ? असा सवाल करत नागरिकांना दीडशे रूपयातच लस मिळावी अशी मागणी आपण करत असून याला मान्य न करण्यात आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी आज लसीच्या मूल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, “सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत, ही लस आम्हाला सरकारला मिळणार्‍या १५० रुपयांत मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू.” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज  पत्रकार परिषदेत दिला आहे.

आपल्या पुणे येथील केंद्रात अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने या आठवड्याच्या सुरुवातीला लशीची किंमत प्रत्येक मात्रेसाठी ६०० रुपये आणि राज्य सरकारांसाठी, तसेच केंद्र सरकारच्या नव्या करारासाठी ४०० रुपये अशी जाहीर केली होती. सध्या ही कंपनी केंद्र सरकारला विद्यमान पुरवठ्यासाठी प्रत्येक मात्रेला १५० रुपये आकारते.

Exit mobile version