Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतीचा व्यावसायिक कारणासाठी वापर; प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील एका शेतकर्‍याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता आपल्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केल्याची तक्रार ललीत पाटील यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, तालुक्यातील मनवेल येथील गट क्रमांक १ क्षेत्र ९२ .०० चौरस मीटर शेतात १५ वर्षापासुन एरटेल कंपनीचा टॉवर व गुरांचा गोठा असुन बेकायदेशीर बांधकाम करून अरुण कालुसिंग पाटील व त्यांचा परिवार त्या ठिकाणी राहात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भातील लिखित तक्रार ललीत पाटील यांनी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे केली आहे. 

या संदर्भात पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सदरच्या जागेवर मागील २५ वर्षापासुन बेकायदेशीर बांधकाम करुन अरुण पाटील यांच्या परिवाराचा रहिवास या ठिकाणी सुरु आहे.  अरुण पाटील यांनी या ठिकाणी रहीवास करीता कायदेशीर परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदरचे व्याक्ती ही राजकारणी असल्यामुळे कुठली परवानगी घेतली नसल्यामुळे  संबधीत शेताच्या उपयोग वाणिज्य वापर करण्यात यावा व संबधीतांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अ‍ॅड. ललीत हुकूमचंद पाटील यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग फैजपुर यांच्याकडे या निवेदनद्वारे  केली आहे.

Exit mobile version