Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धार येथील पिरबाबांची ४ ऑगस्ट रोजी उरुस यात्रा

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धार येथे सालाबादप्रमाणे हजरत सैय्यद अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा यांची उरुस यात्रा गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी रोजी संपन्न होणार आहे.

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या धार ता अमळनेर जि जळगांव येथील पिरबाबांची दर्गा येथे हिंदु मुस्लिम समाजाच्या दररोज शेकडो भाविक येत असतात. उरुस यात्रेसाठी गुजरात, मध्य प्रदेशसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. इस्लामी महिन्याचा प्रथम महिना मोहरमच्या पाच तारखेला दर वर्षी उरुस यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो.

मागील दोन वर्षांपासून कोरोना असल्याने यात्रा रद्द करण्यात आली होती. सालाबादप्रमाणे यंदा यात्रेचे कार्यक्रम होणार असून बुधवार, दि. ३ ऑगस्ट रोजी रोजी संदल तर गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी उरुस यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी चारचाकी, मोटरसायकल, रिक्षा, बस व इतर वाहनांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी सावकाशपणे यावं. एकमेकांना सहकार्य करावं. गर्दीत लहान मुलांना सांभाळावं. असं आवाहन हजरत सैय्यद अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा धार शरीफ ता अमळनेर जिल्हा जळगांव येथील मुजावर पंच कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version