Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘लंपी स्किन डिजीज’ आजारावर तातडीची बैठक

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मागील काही दिवसांपासून तालुक्यातील गुरांना होणारा लंपी स्किन डिजीज हा एक गंभीर संसर्गजन्य रोग असून तो झपाट्याने पसरत आहे. याबाबत काय उपाययोजना करावी, यासाठी पंचायत समितीच्या पशुधन विभागामार्फत सरपंच व ग्रामसेवक यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांची अनेक मौल्यवान गुरे मारली जात असल्याची वस्तुस्थिती शेतकरी पाहतात.

यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात यावलचे तहसीलदार मेहश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरेढोरांच्या लंपी या धोकादायक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातीत ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी बांधवांना या आजारापासुन अधिक सर्तक व सावधान राहण्याच्या मुचना दिल्या असुन येणारा पोळा हा सण आपणास अगदी साद्या पद्धतीने साजरा करायचा आहे. सर्व ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुरढोर यांचे पंचायतीच्या पातळीवर प्रशासनाच्या माध्यमातुन १०० % टक्के लसीकरण करणे हे अत्यंत गरजे आहे.

या गुरांवर आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य धोकादायक लंपी स्किन डिसीज हा आजार खुप मोठया प्रमाणात तालुक्यात व जिल्ह्यात वेगाने वाढत असुन यामुळे शेकडो गुरठोर दगावली जात आहे या गंभीर समस्यामुळे शेतकरी बांधव मोठया संकटात ओढवला गेला असुन या आजारास पुर्णपणे संपाविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची गरज असल्याने यासाठी यावल पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार महेश पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, यावलचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ.  एस.एन. बढे   यांच्यासह बैठकीस तालुक्यात सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

Exit mobile version