Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपांत्य फेरीत भारत संघाच्या तीन विकेट

cek

मँचेस्टर वृत्तसंस्था । भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलची लढत सुरु आहे. ४६.१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडला ५ बाद २११ धावा करता आल्या आहेत. पावसामुळे काल सामना थांबविण्यात आला होता. उर्वरित सामना आज खेळविण्यात येत आहे.

बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत 3 विकेट घेतल्या. शिवाय त्यानं रॉस टेलरला धावबाद करून भारताला मोठे यश मिळवून दिलं. या कामगिरीसह जडेजानं वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा मान मिळवला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक म्हणून जडेजानं अव्वल स्थान पटकावले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.

Exit mobile version