Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहुचर्चित ‘लफडं’या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

पारोळा प्रतिनिधी । पारोळा येथील रहिवाशी महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘लफडं’ या चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच धुळे येथे लॉचिंग करण्यात आले.

या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. धुळे शहरातील जे.आर.सीटी हायस्कूल येथे पोस्टर  आनावरण सोहळा उत्साहात पार पडला. लफडं या चित्रपटाच्या कलाकारांचा परिचय करण्यात आला. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या खानदेशातील विविध ठिकाणावर  होणार आहे. या चित्रपटात बहुतांशी कलाकार हे खानदेशातील असून चित्रपटाचे दिग्दर्शक महेश थोरात हे असून निर्माता  महेश थोरात व सीमा साखरकर हे आहेत. तसेच असोसिएट दिग्दर्शक सचिन बिऱ्हाडे हे करणार असून गीत संगीत नितीन-प्रसाद टीम यांचा असेल तसेच प्रॉडक्शन चेतन सोनार व भटू चौधरी हे बघणार आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.

Exit mobile version