Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शबरी माता भिल आदिवासी विकास संस्थेच्या फलकाचे अनावरण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील महात्मा फुले नगर, बाहेरपुरा, आदिवासी भिल समाज खारवन वाडी येथे शबरी माता भिल आदिवासी विकास संस्थेच्या फलकाचे अनावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

फलक अनावरणाआधी समाज बांधवांनी शहरातील महाराणा प्रताप चौक, राजे छत्रपती संभाजी महाराज चौक, भुयारी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्थानक रोड ते खारवन वाडी पर्यंत ढोल ताशांच्या गजरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.

याप्रसंगी शबरी माता भिल आदिवासी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक बर्डे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रदिप अहिरे, संस्थापक खजिनदार शरद अहिरे, महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनिता अहिरे, भडगाव तालुका अध्यक्ष दयानंद बोरसे, भडगाव तालुका उपाध्यक्ष संजय बागुल, भडगाव शहर अध्यक्ष संभाजी भिल, पाचोरा तालुका अध्यक्ष शांताराम मोरे, एरंडोल तालुका अध्यक्ष रावसाहेब ठाकरे, पारोळा ता. अध्यक्ष बाळु भिल सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version