Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्रोही साहित्य संमेलन आयोजन समितीतीतर्फे महात्मा फुलेंच्या पत्राचे अनावरण !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीतर्फे महात्मा फुलेंनी ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्राचे अनावरण क्षत्रिय काच माळी समाज मंडळ संचलित महात्मा फुले अभ्यासिकेत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथकार सभेस पाठवलेले सदरचे पत्रच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा वैचारिक पाया आहे असे याप्रसंगी विद्रोही साहित्य संमेलन समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या वतीने यावेळी अमळनेर क्षत्रिय कांच माळी समाज मंडळाच्या महात्मा फुले अभ्यासिकेस विविध वैचारिक व प्रेरणादायी पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच गंगाराम महाजन होते. विचारपीठावर उपस्थित प्रा अशोक पवार, प्रा.डॉ  लिलाधर पाटील, माळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष मनोहर महाजन, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्याम पाटील,अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, राजेंद्र महाजन, गौतम मोरे,भाऊसाहेब महाजन,नरेंद्र पाटील,बापूराव ठाकरे,अजिंक्य चिखलोदकर, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार आदींच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना प्रा.लिलाधर पाटील यांनी सांगितले की ज्या साहित्यातून सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचे प्रश्न दुःख वेदना मांडली जात नाही अशा साहित्याचा आणि आमचा मेळ बसत नाही असे सांगून महात्मा फुलें यांनी पहिल्या मराठी साहित्य संमेलनास ’उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांचे संमेलन’ असे संबोधिले  व तेथे जाण्यास नकार दिला होता.तसेच हा कष्टकरी समाज शिकला म्हणजे तो स्वतःच्या सन्मानाची संमेलनं स्वतः भरवेल अशी अपेक्षा ग्रंथकार सभेस पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली होती.सदरचे पत्रच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा वैचारिक पाया असल्याने पत्राचा आशय प्रा.पाटील यांनी उपस्थितांना समजावून सांगितला.

याप्रसंगी बोलताना अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे वास्तव प्रश्नांवर भाष्य करणार्‍या, मानवतावादी साहित्याचा पुरस्कार करणार्‍या साहित्यिकांना ऐकण्याची एक सुवर्णसंधी असल्याने यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपस्थितांना केले. माळी समाज मंडळाचे अध्यक्ष मनोहर महाजन यांनी, महात्मा फुले यांच्या दाखवलेल्या मार्गाने समाजाच्या भावी पिढीला घेऊन जाण्यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करीत असून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दिली. सूत्रसंचालन माळी समाज मंडळाचे सचिव गणेश महाजन यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने माळी समाज पंचमंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.आभार ड.सुदाम महाजन यांनी मानले.

याप्रसंगी संत सावता माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश महाजन,उपाध्यक्ष अशोक महाजन, अ.भा.म.फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.भिमराव महाजन, समता परिषदेचे प्रताप पाटील,गुलाब महाजन, माजी नगरसेवक देविदास महाजन, प्रा.डॉ.योगेश महाजन, ड.रमाकांत महाजन, गणेश शंकर महाजन, अजय भामरे, सोपान भवरे, श्रीकांत चिखलोदकर, प्रा.रमेश माळी, प्रा.प्रकाश माळी, रविंद्र महाजन,श्रावण महाजन, सुदाम महाजन,गणेश पांडुरंग महाजन, नरेश महाजन, बी.आर.महाजन, तुळशीराम महाजन आदि मान्यवर

Exit mobile version