Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उंटावद येथील विकासोची निवडणूक बिनविरोध

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून ही परंपरा कायम ठेवली आहे.

तालुक्यातील उंटावद येथील ग्राम पंचायतचे माजी सरपंच भाऊराव पाटील व त्यांचे पुतणे तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.

यात शशीकांत गुलाबराव पाटील(इतर मागासवर्गीय मतदार संघ), दिलीप यशवंत पाटील (सर्वसाधारण), साहेबराव महारू पाटील(सर्व साधारण ) विवेक गणपत पाटील(सर्व साधारण), त्र्यंबक जयराम पाटील(सर्व साधारण), जगदीश भाऊराव पाटील(सर्व साधारण), अरूण दयाराम सोनवणे(सर्व साधारण), विकास राजधर पाटील(सर्व साधारण), मुरलीधर सुधाकर पाटील(सर्व साधारण), रेशमाबाई एकनाथ पाटील(स्री राखीव), मिनाबाई शांताराम पाटील(स्री राखीव) अशोक पितांबर महाजन(भटक्या विमुक्त जाती जमाती), किशोर कडू सपकाळे(अनु.जाती जमाती) यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे तर उंटावद वि.का.सोसा.ने बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवली आहे.

या निवडणूकीत दुध डेअरीचे चेअरमन रामदास धनजी पाटील सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील,सुधाकर हिंम्मतराव पाटील,अनिल राजधर पाटील,गोकुळ धोंडू कोळी,माजी ग्रा.प.सदस्य शांताराम मार्तंड पाटील ग्रा.प.सदस्य डिगंबर धना सपकाळे तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष रामचंन्द्र वामण सपकाळे जेष्ठ नागरीक दिनकरराव केशवराव पाटील,युवराज बुटन पाटील,दत्तात्रय भाईदास पाटील,भगवान अभिमन पाटील विजय मिठाराम पाटील ग्रा.प.लिपीक दत्तात्रय ताराचंद पाटील,सुनिल चिंतामण कोळी तसेच सरपंच,उप सरपंच सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version