Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजोरे विकासोच्या चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाची बिनविरोध निवड

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – यावल तालुक्यातील राजोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी गिरधर काशिनाथ पाटील तर व्हाइस चेअरमनपदी पद्माकर लक्ष्मण महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावल तालुक्यातील राजोरे विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत उसतोड शेतकरी पॅनलतर्फे गिरधर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली १२ पैकी १० जागा मिळवून दणदणीत विजय संपादन केला.

नवनिर्वाचित संचालक गिरधर काशिनाथ पाटील यांच्या अध्यक्षस्थेखाली, निवडणुक निर्णय अधिकारी संजय एस शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासोच्या चेअरमन तसेच व्हाइस चेअरमन निवडीसाठी विकासो सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

यावेळी चेअरमनपदी गिरधर काशिनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पद्माकर लक्ष्मण महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन या निवडीनिमित्त त्यांचे स्वागत करण्यात आले. या सभेला नवनिर्वाचित संचालक सुभाष महाजन, गोपाळ महाजन, चंद्रकांत पाटील, मनोहर भारंबे, दिवाकर पाटील, नरेन्द्र लोंखडे, भुषण नेहते, शहादु काकडे, भारती नारखेडे, मिराबाई झांबरे आदि संचालक सदस्य उपस्थित होते. निवडणुक यशस्वीतेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी संजय शिंदे, सोसायटीचे सचिव सुरेश मानेकर यांनी सहकार्य केले.

Exit mobile version