Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा सेवा संघाच्या अध्यक्ष व सचिव पदाची बिनविरोध निवड

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात गुरुवारी आयोजित बैठकीत तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तालुक्यातील सावखेडासिम येथील अजय आत्माराम पाटील यांची तर सचिवपदी अतुल निळकंठ यादव यांची निवड करण्यात आली आहे.

येथील तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारणीची निवड यासह विविध विषयावर येथील तालुका खरेदी विक्री संघाची सभागृहात गुरुवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. मुकेश येवले हे होते. या बैठकीत तालुकाध्यक्षपदी अजय पाटील तर सचिवपदी अतुल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अन्य कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मोहराळे येथील धनराज जिजाबराव पाटील, के. यु.पाटील, बी.डी.पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी डी.बी.पाटील, सहसचिवपदी उंटावद येथील महेश पाटील, कोषाध्यक्षपदी दहिगावचे संदीप बाळकृष्ण पाटील, यावल तालुका संघटकपदी किनगावचे मनीष विजयकुमार पाटील, तर कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. देवेंद्र पाटील, अॅड. निवृत्ती पाटील, आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून यावल येथील डॉ. हेमंत जयवंतराव येवले यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणी सदस्यांमध्ये नरेंद्र पंढरीनाथ चव्हाण, प्रा.आर.एस.ठिगळे, संजय बाजीराव भोईटे, विकास तुळशीराम मराठे यांचा समावेश आहे.

याप्रसंगी नूतन अध्यक्ष अजय पाटील यांनी “सेवा संघाचे सभासद वाढविणे, यासह आगामी वर्षात गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव करणे, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थीना शैक्षणिक कार्यासाठी योग्य ती आर्थिक मदत करणे, समाजातील चांगले कार्य करणाऱ्यांचे समाजसेवी व्यक्तिंचे सत्कार करण्याशिवाय, अंधश्रद्धेविषयी जनजागृती करणे. त्याप्रमाणे विविध सामाजिक स्तरावर विधायक उपक्रम राबविण्यात यावे.” असे विषय यावेळी बैठकीस उपस्थित समाजातील जेष्ठ मंडळींनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित समाजबांधवाचे आभार के.यु पाटील यांनी मानले.

Exit mobile version