Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव नगरपालिकेतर्फे खा. उन्मेष पाटील यांचा सत्कार

chalisgaon satkar

चाळीसगाव प्रतिनिधी । नुकतेच विक्रमी मताधिक्याने खासदारपदी विराजमान झालेल्या उन्मेष पाटील यांचा आज येथील नगरपालिकेतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला.

आज पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या वतीने नगरसेवक व पालिका कर्मचारी यांच्यातर्फे खासदार उन्मेष पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर पालिकेचे गटनेते संजय पाटील, शिवसेनेचे तालुकप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत, ज्येष्ठ नेते विश्‍वासराव चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी पालिकेच्या आरोग्य ,पाणीपुरवठा ,आस्थापना, घरपट्टी, पाणीपट्टी ,सफाई कामगार या सर्व विभागांच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचारी युनियन च्या वतीने अध्यक्ष तथा अभियंता राजेंद्र पाटील यांनी खासदार महोदय यांचा सत्कार केला.
मुख्याधिकारी अनिकेत मानकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी खासदार उमेश पाटील यांच्या कामकाज पद्धतीविषयी समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्षा आशातला चव्हाण यांनी उन्मेषदादांनी आजवर शहरांमध्ये विकासाची गंगा आणली असून आज खासदार झाल्याने विक्रमी मतांनी दिल्ली काबीज केली आहे जनतेने भरभरून प्रेम दिल्याने उन्मेष पाटील यांचा राज्यात गौरव होत असल्याचा आम्हाला आभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. गटनेते संजय पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील यांची लवकरात लवकर मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नगरसेवक विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, चिराग शेख, बापूसाहेब आहिरे, प्रभाकर चौधरी, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, संगीता गवळी, भास्कर पाटील, सदाशिव गवळी पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, दिगंबर वाघ, संजय आहीरे, अमोल चौधरी, माधव कुटे , दीपक देशमुख, विजय खरात, भूषण लाटे, किरण निकम, संजय गोयर, आहिरारव,सुर्यवंशी , बंडू पगार, निलेश गायके गौरव पुरकर, कल्पेश महाले, शेषराव चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, गणेश महाले यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख कर्मचारी, सफाई कर्मचारी, मुकादम कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसेविका संगीता गवळी यांनी तर आभार ज्येष्ठ नेते विश्‍वासराव चव्हाण यांनी मानले.

सत्काराला उत्तर देतांना खासदार उन्मेष पाटील यांनी आपण दिल्लीत असलो तरी चाळीसगावला विसरणार नसल्याची ग्वाही दिली. येत्या काळात अधिक जोमाने काम करून शहराचा अपेक्षित कायपालट करण्यासाठी मी कटिबद्ध असून पालिकेच्या कर्मचारी अधिकारी नगरसेवक यांनी हातात हात घालून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू या असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.

Exit mobile version